मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी खरवंडी गावच्या ग्रामस्थांनी पुढाऱ्यांना गाव बंद केले आहे. आमदार मोनिका राजळे एका कार्यक्रमानिमित्त खरवंडीत गेले असता मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली.एक मराठा लाख मराठा …आमदाराचा निषेध असो, अशी घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ उडाला.
सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष अंबादास जगताप यांनी आमदार यांच्याशी चर्चा केली. तुम्ही मराठा आरक्षण विषयी आमदारपदाचा राजीनामा देणार का? यावर आमदार राजळे म्हणाल्या पाहू मात्र मनोज जरांगे पाटलांना माझा पाठींबा आहे असे मत व्यक्त केले. आमदार राजळे दशक्रिया विधी निमित्त खरवडी कासार येथे आल्या होत्या.
त्यामुळे मराठा समाज महिला ग्रामस्थ राजळे यांच्या वाहनासमोर गावबंदी निषेध व्यक्त केला. दुःखद घटना कारणाने काळे झेंडे न दाखवता आ. राजळे यांच्याशी महिला तसेच अंबादास जगताप यांनी आरक्षण विषयावर संभाषण झाले निषेध व्यक्त करू नये असे काही राजळे समर्थक कार्यकर्ते मध्यस्थी करत होते.
जगताप म्हणाले, गावात दुःखद प्रसंग म्हणून शांत आहे. आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना प्रवेश बंदी म्हणजे बंदीच गावात येताना पुढील परिणामाची दक्षता घेणूनच प्रवेश करावा आता आमच्या भावनेचा अंत संपला आहे, असे ते म्हणाले.
