अकोला पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचं शुक्रवारी (३ नोव्हेंबर) निधन झालं. ते कर्करोगानं ग्रस्त होते.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी शहरातील अन्नपूर्णा माता मंदिराजवळ त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत.
सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान : अकोल्यातील श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
त्यांनी मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही काम केलंय. त्यांच्या पश्चात पत्नी गंगादेवी शर्मा, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांनी रामदेवबाबा, शामराव मंदिर, सालासर हनुमान मंदिराचे विश्वस्त म्हणूनही काम केलंय.
पश्चिम विदर्भातील ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याचं कामही त्यांनी केलं होतं. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिलंय.
