राज्यात दोन दिवस पावसाचा अंदाज, ‘या’ जिल्ह्यात अलर्ट

राज्यातील तापमानात सध्या चढ उतार दिसून येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस नाही. पण हवामान विभागाने उद्यापासून दोन दिवस राज्याच्या भागात पावसाचा अंदाज दिला.

हवामान विभागाने उद्या आणि परवा म्हणजेच शनिवारी आणि रविवारी काही भागात पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने उद्या सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.

या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. तसेच यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

यासोबतच रविवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात विजांसह लक्या सरी काही भागात पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Leave a Comment