संगमनेर(DSNews24) जीवनप्रवासात अचानक नेमक काय घडेल हे काही सांगता येत नाही. काही घटना अशा असतात की अचानक धक्का देणाऱ्या असतात. अशीच एक घटना संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथे घडलीय.
विनायक सोनबा ढेंबरे यांचं ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. वार – मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
त्यामुळे बिरेवाडीकरांसह परिसरात विनायकरावांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
