पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) लाभार्थ्यांसाठी एक आनंदवार्ता आहे. येत्या काही दिवसांत कदाचित घरगुती गॅस सिलेंडरवर त्यांना अजून सबसिडी मिळण्याची दाट शक्यता आहे.
पुढील वर्षी लोकसभा निवडणूक आहे. त्यापूर्वीच लाभार्थ्यांना हा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या या लाभार्थ्यांना 12 सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळते.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना येत्या काही महिन्यातच ही सवलत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी कदाचित सिलेंडरच्या किंमतीत कपात होऊ शकते. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक असेल हा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
