अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले 

राष्ट्रवादीमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र आले होते. आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजितदादा यांची भेट झाली. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. अजित पवार या भेटीनंतर दिल्लीला रवाना झाले आहेत.

शरद पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी या भेटीबद्दल विचारले, त्यावेळी ते म्हणाले की, “सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुख, समृद्धी भरभराटीच जावो” अजित पवारांसोबत झालेली भेट कौटुंबिक होती, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या दिल्लीत दौऱ्याबद्दल बोलणे शरद पवार यांनी टाळले.

Leave a Comment