मॉन्सूनने निरोप घेऊन महिन्याभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. ऑक्टोंबर हिटचा तडाखाही राज्याने अनुभवला. त्यानंतर आता दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा फटका बसत आहे.
आता पुढील २४ तासांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा पुणे हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला.
पावसामुळे वातावणात बदल झाला आहे. अनेक शहराच्या तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान यवताळमध्ये नोंदवण्यात आले. यवतमाळचे तापमान १६ अंश सेल्सियस होते.
