मुंबई : शरद पवार(Sharad Pawar) हे महाराष्ट्रातला कधीही आवाज न करणारा फटका आहे आणि तो फटका लवकच फुटणार असल्याचा दावा भाजपचे नेते प्रवीण दरेकर(Pravin Darekar) यांनी केलाय. तसेच ‘शरद पवार हे लवकरच महाराष्ट्राच्या विकासात आम्हाला साथ देतील; असा गौप्यस्फोटही प्रवीण दरेकरांनी केलाय.
अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर प्रवीण दरेकरांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानलं जात आहे. ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना प्रवीण दरेकरांना हा मोठा गौप्यस्फोट केला. प्रवीण दरेकरांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलय.
राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रतापराव पवारांच्या घरी अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. त्यानंतर अजित पवार हे थेट दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. त्यातच आता प्रवीण दरेकरांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार हे ॲटम्ब बॉम्ब आहेत. ते दिल्लीत जाऊन काय फटाके फोडतायत ते लवकरच कळेल असा दावा देखील प्रवीण दरेकर केलाय. दोन बॉम्बस्फोटानंतर काहीही फुटलं तरी ते आमच्या पथ्यावर पडणार आहे, असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
