पवार कुटुंबीयांच्या बारामतीतील दिवाळीकडे सर्वांचंच असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवारांच्या दिवाळीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) सहभागी होणार का नाही याची उत्सुकताही सर्वांनाच लागली आहे.
त्यातच शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे एकत्रित दिसले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजितदादा आपल्या बहिणीला दिवाळीचं काय गिफ्ट देणार यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आमच्यात राजकीय मतभेद आहेत, पण ते मतभेद आम्ही कुटुंबामध्ये आणत नाही, आमची लढाई ही वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर यंदाच्या दिवाळीत दादा आपल्या बहिणीला काय गिफ्ट देणार हे मला काय माहिती? दादालाच विचारा काय गिफ्ट देणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
