अहमदनगर, पुण्यासह राज्यात कसं असेल वातावरण, वाचा हवामान अंदाज 

रबी समुद्रामध्ये चक्रीय वाऱ्यामुळे राज्यातील कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील वातावरण येत्या आठवड्यात ढगाळ राहणार आहे. या वातावरणामुळे २३ नोव्हेंबरनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

यामुळे किमान तापमानात घट होऊन थंडी कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

कार्तिक एकादशी ते कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा २३ ते २६ नोव्हेंबर दरम्यान अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण असेल.

मर्यादित क्षेत्रात रब्बीतील ज्वारी, हरभरा पिकांना वरदान ठरू शकणाऱ्या मध्यम पावसाची शक्यता जाणवते, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. थंडीचा जोर वाढल्यास त्याचा रब्बी हंगामातील पिकांना चांगला फायदा होणार आहे.

Leave a Comment