मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

राज्यातील एसटी महामंडळाचा चेहरा मोहरा बदल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसटी बसस्थानकांवर आता महिला बचतगटासाठी स्टॉलना मंजूरी दिली जाणार आहे.

तसेच जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकावर ‘आपला दवाखाना’ देखील सुरु होणार असून दहा टक्के स्टॉल माजी सैनिकांच्या विधवा पत्नींला दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

नव्या वर्षांत प्रवाशांसाठी 3,495 एसटी बसेस सेवेत दाखल केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एसटी महामंडळाचे प्रत्येक बसस्थानकांवर महिला सशक्तीकरण धोरणांतर्गत महिला बचत गटांना स्टॉलचे वाटप होणार आहे. राज्यातील एकूण बसस्थानकांपैकी 10 ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना दूध, दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे स्टॉल देण्याचा निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली आहे.

बसस्थानकांवरील स्टॉलच्या वाटपासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी चर्चा करून योजना तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनीस यावेळी दिले आहेत.

Leave a Comment