पुण्यातील हिंजवडी येथे राहणाऱ्या एका तरुणीने प्रियकराने लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून टोकाचं पाऊल उचललं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली आहे.
याप्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने फिर्याद दिली असून गौरव पाटील (रा. धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गौरव पाटील आणि फिर्यादी हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. तरीही गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले होते. त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत शारीरिक संबंधही ठेवले.
त्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास त्याने नकार दिला. या नैराश्यातून तरुणीने राहत्या खोलीत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
