अहमदनगर : जिल्हयातील नागरीकांना कळविणेत येते की, भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात दि. 27/11/2023 रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.
दि. 28/11/2023 ते 29/11/2023 या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे.
