संगमनेर ब्रेकिंग! आळंदीकडे निघालेल्या दिंडीतील आचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

संगमनेर(DSNews24 ) तालुक्यातील पोखरी हवेली येथून श्री क्षेत्र आळंदीकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्याचा घारगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत काशिनाथ उदमले (वय-६२,रा. पोखरी हवेली) असे मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

पोखरी हवेली येथून हनुमान दिंडी सोहळा पायी दिंडीने रविवारी (दि.३) प्रस्थान केले होते. रात्रीचा मुक्काम चंदनापुरी येथे केला होता. सोमवारी माहुली येथे जेवण करून दिंडी घारगाव येथे मार्गस्थ झाली. घारगाव येथे वारकऱ्यांनी रात्रीचे जेवण केले. यातील आचारी शशिकांत उदमले यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

त्यामुळे उपचारासाठी त्यांना ताबडतोब रुग्णवाहिकेतून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून ते मृत झाल्याचे सांगितले. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment