बाभळेश्वर ग्रामपंचायत सरपंचपदी संगिता शिंदे बिनविरोध

बाभळेश्वर(DSNews24) भौगोलिक दृष्ट्या बाभळेश्र्वर गाव मोठे असून या ठिकाणी मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. सौ. शालिनीताई विखे पाटील व खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाची एकहाती सत्ता आहे.

गावच्या सरपंच कै. सौ. विमलताई म्हस्के पा. यांचे निधन झाल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेची निवड  दि. ६ डिसेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत सौ. संगिता श्रीकांत शिंदे पा. यांच्या नावाची एकमुखी सूचना मांडल्याने एकच अर्ज दाखल झाला, त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुकीचे कामकाज अध्यासी अधिकारी सौ. वैशाली मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले, यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती बबलू म्हस्के, प्रवरा कारखाना संचालक साहेबराव म्हस्के, प्रवरा बँक संचालक शंकर बेंद्रे, प्रवरा बँक माजी संचालक दादासाहेब म्हस्के, पोलीस पाटील काकासाहेब म्हस्के, प्रभारी सरपंच राहुल डहाळे, तंटामुक्ती अध्यक्ष आण्णासाहेब बेंद्रे, माजी उपसपंच अमृत मोकाशी, सोसायटी चेअरमन दौलत बेंद्रे, माजी उपसरपंच अजित बेंद्रे, तलाठी मंडलिक भाऊसाहेब,

ग्रामविकास अधिकारी आर. ए. शेख, ग्रामपंचायत कर्मचारी सौ. शालिनी कोकाटे, श्री. सतीश तुपे, श्री. अनिल गायकवाड, श्री. शिवाजी कोकाटे, श्री. सतीश म्हसे, श्री. विकास वाकचौरे, श्री. चंद्रकांत गोसावी, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी, श्री छत्रपती शिवाजीनगर मित्रमंडळी, शिंदे परिवारातील एकनाथ शिंदे, विष्णु शिंदे, रणजीत शिंदे, विश्वास शिंदे, सतीश शिंदे, नवनाथ शिंदे, सागर शिंदे, ज्ञानदेव शिंदे, प्रदीप शिंदे, शुकलेश्वर शिंदे, हेमंत शिंदे अशी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

Leave a Comment