मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी मराठा बांधवांचं आंदोलन सुरू होतं, याचदरम्यान लाठीचार्ज झाला होता. यावर आता फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं आहे.
‘जालना आंदोलनात हिंसक जमावाकडून केलेल्या दगडफेकीत 79 पोलीस अधिकारी आणि अंमतलदार जखमी झाले आहेत. पोलिसांनी बचावात्मक पध्दतीने वाजवी बळाचा वापर केला त्यात 50 आंदोलक जखमी झाले.
नांदेड जिल्ह्यात (नांदेड – देगलूर ) राज्य मार्गावर जे आंदोलन झाले त्यात 4 पोलीस आणि 10 आंदोलक जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यात आंदोलनादरम्यान 3 पोलीस आणि 3 अंमलदार जखमी झाले आहेत.
जालना अंबड येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या प्रकरणी अपर महापोलीस संचालक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, जालना पोलीस अधिक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत तपासणी करून कार्यव्हावी केली जाईल असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
