संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील सरपंचाने तीन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सरपंचपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात जिजाबाई भाऊसाहेब सागर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
मात्र आता उपसरपंच अण्णा कढणे यांनी देखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया देखील ११ डिसेंबर रोजी बिरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार आहे.
तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन सरपंच व उपसरपंचाकडे कारभार जाणार आहे. आता उपसरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याचीच उत्सुकता पुन्हा बिरेवाडी करांना लागली आहे.
