मोठी बातमी! निळवंडे जलाशयाचा कालवा फोडण्याचा प्रयत्न……

निळवंडे जलाशयाच्या डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्याची मागणी करीत आज (मंगळवार) अकोले (akole) तालुक्यातील खानापूर शिवारात शेतक-यांनी आंदोलन छेडले. कालव्यातील पाणी गळतीमुळे शेकडो हेक्टर जमीन नापीक होत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य शेतक-यांनी आंदाेलनस्थळी आक्रमक पवित्रा घेतल्याने पाेलिसांनी आंदाेलकांना राेखले.

यावेळी काही आंदोलकांकडून कालवा फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर कालव्या जवळ आंदोलकांनी ठिय्या मांडला. त्यानंतर जलसंपदा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले.

यावेळी आंदाेलकांनी कालव्यांच क्रॉंक्रीटीकरणं आणि अस्तरीकरण करावे अशी प्रमुख मागणी केली. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी देखील मागणी करण्यात आली.

यावेळी आंदोलकांची अधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात यश आले नाही. अखेर पाेलिसांच्या मध्यस्तीने आंदाेलकांत आणि अधिका-यांत चर्चा सुरू झाली.

Leave a Comment