अहमदनगरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढवणार

राज्यात सर्वत्र गारठा जाणवत असून विदर्भातील तापमानात मोठी घसरण होत आहे हवामान विभागानुसार पुढील काही दिवस थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागांत जाणवणार आहे.

उत्तर भारतात थंडीचा कहर सुरु असून पर्वतांवर बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून थंड वारे वाहू लागले असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात थंडी वाढली आहे. विदर्भातील ११ तर खान्देशातील ३ जिल्ह्यांसह नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी या २२ जिल्ह्यांत थंडी जाणवणार आहे. दिवसाच्या थंडीबरोबर रात्रीच्याही थंडीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नागपुरात काळपासून चांगलीच थंडी पडत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. सोमवारी नाशिक १४.२ तर नागपूरचे तापमान १२.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्रापेक्षा विदर्भात थंडी जास्त असल्याचे दिसून येत आहे. पुढील आठवडा राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला.

डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये तापमानात घट झाल्याने थंडी वाढली आहे. यासोबतच पहाटे अनेक ठिकाणी दाट धुकेही पाहायला मिळत आहे.

हवामान खात्याने एक्स हँडलवर (पूर्वीचे ट्विटर) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस हरियाणा, पंजाब, चंदीगड, आसाम, मेघालय येथे सकाळी दाट धुके असेल. मंगळवार ते २१ डिसेंबरपर्यंत दाट धुक्यापासून दिलासा मिळण्याची आशा नाही, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Leave a Comment