पारनेर(DSNews24) तालुक्यातील खडकवाडी येथील आदर्श शैक्षणिक संकुलातील क्रीडा महोत्सव दि. 20 डिसेंबर 2023 ते दि. 23 डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडणार आहे. या सुरू झालेल्या आदर्श क्रीडा महोत्सव दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कलागुणांना वाव देण्यासाठी हा क्रीडा महोत्सव दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये पार पडतो.
या क्रीडा महोत्सवास प्रमुख उपस्थिती म्हणून पै. युवराज दादा पठारे (नगरसेवक पारनेर नगरपंचायत), उपसरपंच अक्षय ढोकळे, पै.तुषार दादा धुळगंड (युवक काँग्रेस सरचिटणीस संगमनेर तालुका), भाऊसाहेब टेकुडे चेअरमन, कारभारी दादा आहेर, विठ्ठलराव रोकडे, सुभाष शेठ गांधी, भाऊसाहेब आहेर सर, पत्रकार संतोषराव कोरडे, चेअरमन संजय शिंगोटे, ह.भ. प. बाबा महाराज खामकर, प्रसाद दादा कर्नावट, निजाम भाई पटेल, पंडित गागरे सर, प्रतापराव रोकडे, अमोलशेठ रोकडे, बि.डी ढोकळे, मेजर बाबासाहेब रोकडे, मेजर जालिंदर खनकर, अनिलराव गागरे, गणेशशेठ चौधरी, शरद शेठ ढोकळे, अक्षय दादा हुलावळे, ॲड. तुषार साळवे, सचिन ढोकळे, देविदास साळुंके, संतोषराव गागरे, भाऊसाहेब महाराज गागरे, अविनाश ढोकळे, कुशिनाथ हुलावळे, विलास काका गागरे, माणिक दाजी रोहकले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक म्हणून प्रा.गांगड मॅडम, ह.भ.प.कृष्णकांत महाराज खनकर , ह.भ.प.बाबासाहेब महाराज शिंदे,काशिनाथ रोहोकले,संजय खणकर यांनी काम पाहिले.
यावेळी मान्यवरांची मनोगते झाली, सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खेळाचे महत्व समजावून सांगितले व आदर्शच्या क्रीडा महोत्सवास शुभेच्छा दिल्या तर संस्थेचे अध्यक्ष डॉ.ढोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने प्रेक्षक पालक उपस्थित होते.
