भाजपचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
सुनील मधुकर धुमाळ यांच्या मृत्यूची नोंद पोलिसांनी अकस्मात अशी केली आहे. परंतु आत्महत्या का केली आहे? याची अद्यापही माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील मधुकर धुमाळ वय ४६, राहणार साडेतरानळी, हडपसर पुणे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील मधुकर धुमाळ हे भाजपचे सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. हडपसर रेल्वे मार्गावर केशवनगर परिसरात मंगळवारी सकाळी एक मृतदेह आढळून आला. तो मृतदेह सुनील धुमळा यांचा असल्याचे लक्षात आहे. त्या ठिकाणी कोणतीही चिठ्ठी आली नाही.
दरम्यान, सुनील यांनी आत्महत्या केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. धुमाळ हे भाजपचे हडपसर युवा मोर्चेचे सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
