काँग्रेस खासदार दीपक बैज, नकुल नाथ, डीके सुरेश यांना गुरुवारी (दि.२१) लोकसभेतून निलंबित करण्यात आल्याने संसदेतील निलंबित खासदारांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. या संदर्भातील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल आणि १३ डिसेंबरच्या संसदेच्या सुरक्षा भंगावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाची मागणी करताना घोषणाबाजी केल्याबद्दल एकूण १४० हून अधिक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
