अबब! रात्रीच्या वेळी माणुसकीच्या भावनेने कारमध्ये लिफ्ट दिली पण घडल भलतंच…..

अहमदनगर – रात्रीच्या वेळी माणुसकीच्या भावनेतून कार मध्ये लिप्ट देणाऱ्या कारचालकाच्या डोक्यात हातोडा मारून त्याला जखमी करत त्याचेकडील हुंदाई कंपनीची ऑरा कार, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेणाऱ्या दोघा परप्रांतीय चोरट्यांना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांच्या आत पकडत त्यांच्या कडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लुटीची ही घटना रात्री नगर – पुणे महामार्गावर सुपा परिसरात घडली होती. सचिन बापु पठारे (वय ३५, रा. पिंपळगांव कौडा, ता.नगर) हे त्याचेकडील हुंदाई कंपनीची ऑरा कार (क्र. एम. एच.१२ व्ही. व्ही. ७३३६) मधुन सुपा येथे त्यांचे कंपनीचे मॅनेजर यांना सोडुन घरी जात असतांना रस्त्त्याने जाणारे दोन प्रवाशांनी त्यांना हॉटेल अमृत येथे सोडणेबाबत विनंती केली.

रात्रीची वेळ असल्याने पठारे यांनी माणुसकीच्या भावनेतून प्रवाशांना गाडीमधे बसवुन घेवुन जात असतांना गाडीमध्ये मागील सिटवर बसलेल्या प्रवाशाने पठारे यांच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तुने मारुन जखमी केले.

व त्याचेकडील कार, मोबाईल, व रोख रक्कम असा एकुण ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला होता. याबाबत सुपा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम ३९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

Leave a Comment