मोठी बातमी! शरद पवार आणि बच्चू कडू एकत्र…..

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टीचे सर्वेसर्वाशरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात आज अमरावती येथे भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली.

शरद पवार हे सध्या दोन दिवसांच्या अमरावती (Amravati) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते.

त्यावर आज गुरुवारी शरद पवार यांनी वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडूंच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

मात्र या भेटीचे आमंत्रण दिल्यापासून चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर आता बंद दाराआड झालेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला जोर मिळाला आहे.

Leave a Comment