सर्दी खोकल्याने हैराण झालात? तर ‘हा’ पदार्थ खा, लगेच आराम मिळेल 

सध्या हिवाळा चालू आहे. थंडीच्या दिवसात शरीराला गरम ठेवणारे पदार्थ खाल्ले जातात. हिवाळ्यात आवर्जून गुळाच्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो; पण फक्त हिवाळाच नाही तर नेहमीच गुळाचं सेवन केल्यास आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरतं.

हिवाळ्यात अनेकांना गूळ खायला आवडतो. यामुळे शरीराला उष्णता मिळते आणि शरीरासाठी ते फायदेशीर असतं. रोज गुळाचं सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठीही गुळाचं सेवन करू शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.

हिवाळ्यात गुळाचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं. गुळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी भरपूर पोषक तत्त्वं आढळतात. ती शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात. गुळामुळे हाडं मजबूत होण्यास मदत होते.

हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी गुळाचं सेवन करू शकता. गूळ उष्ण गुणधर्माचा असतो आणि त्यामुळे तो शरीराला या दिवसांत आराम देतो. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि चेहरा तजलेदार करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता.

सांधेदुखीचा त्रास असला, तरीही तुम्ही ते खाऊ शकता. इतकंच नाही तर पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. मायग्रेनचा त्रास असेल तर रोज गूळ खाण्याने फायदा होतो. नियमितपणे गुळाचं सेवन केल्यास मेंदूही तरतरीत राहतो, स्मरणशक्तीही चांगली राहते.

गूळ खाण्याने शरीराला ऊर्जा मिळते. थकवा दूर होतो. थकवा, कमजोरी जाणवत असेल, तर जरूर गूळ खावा. गुळामुळे शरीर मजबूत आणि कार्यक्षम राहते. शरीर ताकदवान बनवण्यासाठी दुधात गूळ घालून घेणं उपयुक्त ठरतं. खोकला येत असेल तर साखरेऐवजी गूळ खाणं लाभकारक ठरतं.

आल्याबरोबर गूळ गरम करून खाल्ल्यास घशातली खवखव, जळजळ दूर होते. शरीरातली हानिकारक विषद्रव्यं बाहेर काढून टाकण्यात गूळ मदत करतो. त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. मुरमांच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर दररोज गूळ खाणं उपयुक्त ठरतं.

Leave a Comment