राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळणार आहेत. नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत. तर, काँग्रेसचे नऊ नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय. तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणंय. तर काँग्रेसचेच ९ लोकं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामतांनी केलाय.
