ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन-दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं.
याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी विखे पाटील यांना टोला लगावला आहे.
राऊत काय म्हणाले?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केलंय. त्यांनी अनेक पक्ष बदलले. ते आधी शिवसेनेत होते. मग काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपमध्ये आहेत. असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतरविषयी फार जाण नसते.
ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. त्यांच्यावर आता मी काय बोलणार? कोण जातंय कोण राहातंय हे येणारा काळ ठरवेल. पण उद्या भाजपकडे सत्ता नसेल तर तेव्हा विखे पाटील कुठे असणार आहेत? याचाही विचार करून ठेवा, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
