रमेश फिरोदिया महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी..

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार दि. 3 जानेवारी 2024 रोजी भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्यध्यापिका, स्त्रि शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप, उपप्राचार्य रणजीत गिरी, कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. पूजा वलवे आणि प्रा. स्वाती ढोकरे व गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप, उपप्राचार्य रणजीत गिरी, प्रा.पूजा वलवे, प्रा. स्वाती ढोकरे, कला विभाग प्रमुख प्रा. कल्पना शेळके, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्रा .गणेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. म्हतू खेमनर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका प्रा. पूजा वलवे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य या विषयावर विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच प्रा. स्वाती ढोकरे यांनी आजची स्त्रि या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन घोलप म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आदर्श विचारांचे आजच्या तरुण पिढीने अनुकरण केले पाहिजे. सावित्रीबाईंनी स्त्रियांना उजेडाची वाट दाखवली. स्त्रि उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाज उद्धाराचा वसा तितक्याच नेटाने त्यांनी पुढे नेला.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.पोपट खेमनर, प्रा. दत्तात्रय आसवले, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.गणेश साळुंखे, प्रा.योगेश साळुंखे, प्रा.लक्ष्मण कातोरे, प्रा. शबाना शेख, प्रा.शंकर राशिनकर,प्रा.स्वाती सागर, प्रा.संदीप खेमनर, प्रा.हर्षदा हारदे, श्री. मनोहर दूरगुडे श्री.महेश पोखरकर, श्री. लक्ष्मण जाधव, श्री.भाऊसाहेब बहिरट ,श्री. पुंजाहारी वारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियांका हाके यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय जया रक्ते यांनी करून दिला.

तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता बिडवे यांनी केले तर आभार प्रा.वृषाली शिरसाट यांनी मानले.

Leave a Comment