शिर्डी हे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ बनले आहे. लोकसभेचा हा मतदारसंघ सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट डेस्टिनेशन झाला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघावर शिवसेना गटाचा दावा आहे. ठाकरे गटाकडून माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे प्रमुख उमेदवार चर्चेत आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिर्डी मतदारसंघ कोणाकडे जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या तीन निवडणुकांपासून या मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची उमेदवारीसाठी चर्चा असते. पण ऐनवेळी वेगळाच उमेदवार पुढे येतो.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपकडे शिर्डी मतदारसंघाची मागणी केली आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार लोखंडे यांच्यासाठी शिंदे गटालाही शिर्डी हवी आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा मतदारसंघ आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या दृष्टीने हा मतदारसंघ महत्त्वाचा ठरला आहे.
