नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आदलाबदली संदर्भात अद्याप काहीही चर्चा झाली नाही. मात्र शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) त्या जागेसाठी योग्य आणि प्रबळ उमेदवार असल्याचे विधान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
नाशिक येथील दौरा आटोपून संजय राऊत थेट शिर्डीला साई दर्शनाला पोहोचले होते. साईंच्या दर्शनानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
मी महाराष्ट्रातील स्वाभिमानी राजकारणी आहे. राज्यावर सध्या जे संकट आहे ते दूर व्हावे. महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा. शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना चांगले दिवस येण्यासाठी राज्यात चांगले सरकार यावे यासाठी संजय राऊत यांनी साई चरणी प्रार्थना केली, असे त्यांनी म्हटले.
