काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
‘ मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. यासोबतच माझे माझ्या कुटुंबाचे गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेससोबत नाते होते.
या नात्याला देखील पूर्णविराम मिळाला आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला’ असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.
