खळबळजनक! साकूरजवळील चिंचेवाडीत ६५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून 

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील चिंचेवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. चिंचेवाडी शिवारातील मलीबाबा मंदिरासमोर ६५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री च्या सुमारास घडलीय. त्यामुळे पठारभागात मोठी खळबळ उडालीय.

देवराम मुक्ता खेमनर वय ६५ रा. चिंचेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर असे खून झालेल्या मयताचे नाव आहे. नेमका खून कुणी केला? कोणत्या कारणासाठी केला याबाबत कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी घारगाव पोलिसांनी धाव घेत या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, साकूर – संगमनेर महामार्गालगत चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिर आहे. मंदिराबाहेर छोटस शेड उभारले आहे. याच शेडमध्ये देवराम खेमनर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. गुरूवारी सकाळी काही नागरिकांनी मंदिराजवळ बघितले असता देवराम खेमनर अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस काॅन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ दगड, चप्पल, आधारकार्ड आढळून आले. यावेळी दगड पुर्णपणे रक्ताने माखलेले होता. घटनेची गांभीर्य घेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली‌. तसेच पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरूवात केली आहे.

Leave a Comment