मानवसेवा प्रतिष्ठानचा आदर्श माता पुरस्कार संभाजी नगरच्या इंदुबाई मिसाळ यांना प्रदान! 

अहमदनगर(DSNews24/सुनिल नजन) मानवसेवा प्रतिष्ठान संचलित जगमित्र गुरुकुल,मोहोज खुर्द तालुका पाथर्डी येथील जिल्हा अहमदनगर या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार या वर्षी औरंगाबाद (संभाजी नगर) जिल्ह्यातील फुलंब्री येथील आदर्श माता सौ.इंदुबाई मधुकरराव मिसाळ यांना प्रदान करण्यात आला.

स्व. द्रौपदाबाई (आक्का) देविदास मतकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पंढरपूर येथील चारोधाम ट्रस्टचे अध्यक्ष राष्ट्रसंत ह.भ.प.बद्रिनाथ महाराज तनपूरे व त्यांच्या सौभाग्यवती सत्यभामा बद्रीनाथ तनपूरे यांच्या हस्ते आणि पुण्याच्या रासकर वाडीतील समर्थ सदगुरू ज्ञानेश्वर माउली जाधव व ह.भ.प.श्रीराम महाराज मचे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

संस्थेचे अध्यक्ष सुनिल मतकर सर, देविदास मतकर,सौ.राजकंवर दातीर, बाळासाहेब मतकर, जगन्नाथ पाचे सर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Leave a Comment