साकूरवर शोककळा, सभापती शंकरराव खेमनर यांना पितृशोक

संगमनेर(DSNews24) संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नेते हनुमंता सखाराम पाटील खेमनर यांच दुःखद निधन झाल्याची बातमी समोर आलीय.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांचे ते वडील आहे. हनुमंता खेमनर यांची साकूर पठारभागातील एक नामांकित व्यक्तीमत्व म्हणून ओळख आहे.

राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यात कायमच ते अग्रेसर होते. अचानक त्यांच्या निधनाने साकूर पठारभागावर शोककळा पसरली आहे.

त्यांचा अंत्यविधी सोमवार दि.05/02/2024 रोजी सकाळी 10 वा साकूर येथील धुपेश्वार तीरी होणार आहे .

Leave a Comment