बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ खासदाराच्या कारचा दिल्लीत भीषण अपघात 

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात झाला आहे. या अपघातातून हेमंत गोसडे बचावले आहेत. दिल्लीतल्या बीडी रोडवर हेमंत गोडसे यांच्या कारला अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. शासकीय निवासस्थानाजवळच कारला अपघात झाल्याची माहिती समजते.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजधानी दिल्लीतील विश्वंभर दास मार्गावर खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला. अपघात इतका मोठा होता की गाडीचं नुकसान झालंय.

खासदार हेमंत गोडसे हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाहून बाहेर पडत असताना गाडीला मागून धडक बसली. गाडीतील तिघांनाही मार लागला आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

Leave a Comment