मोठी बातमी! काँग्रेसचे सहा आमदार ठरले अपात्र 

राज्‍यसभा निवडणुकीवेळी क्रॉस व्होटिंग केलेल्‍या काँग्रेसच्‍या सहा आमदारांवर पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाई ओढावून घेतली आहे, असे स्‍पष्‍ट करत विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी ( दि.२९ फेंब्रुवारी) ६ बंडखाेर आमदारांना अपात्र ठरवले आहे.

काँग्रेस आमदार आणि संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत बंडखाेर सहा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या सहा आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे हिमाचल प्रदेशच्‍या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला होता.

विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिंग पठानिया यांनी बुधवारी ( दि.२८ फेब्रुवारी) दोन्‍ही बाजू ऐकून घेतल्‍या. व्हीप जारी असतानाही भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान करणे.

याशिवाय अर्थसंकल्प मंजूर करताना सभागृहात अनुपस्थित राहिल्‍याचे आरोप काँग्रेस आमदार राजेंद्र राणा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो, इंद्रदत्त लखनपाल आणि चैतन्य शर्मा यांच्यावर होता. विधानसभा अध्‍यक्ष कुलदीप सिग पठानिया यांनी आज ( दि. २९ फेंब्रुवारी) ६ आमदारांना अपात्र ठरवले आहे

Leave a Comment