Alert : नगर जिल्ह्यात पुढील ‘इतके’ दिवस धोक्याचे… दिला मोठा इशारा

Alert : उत्तर तमिळनाडू ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्चिम बंगाल ते ओडिशा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे.

मध्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वार्‍याची स्थिती आहे.

यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणार्‍या वार्‍यामुळे तयार झालेला कमी दाबाचा पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. नगर जिल्ह्याला 16 आणि 17 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट(Orange Alert) देण्यात आला आहे.

पावसाचे अलर्ट –

गारपिटीसह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे.

Leave a Comment