संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावा अंतर्गत असणाऱ्या माळवाडी परीसरातील वाघवस्ती येथे दिवसा घरफोडी झाली आहे. ही घटना बुधवार दिनांक १५ मार्च रोजी दुपारी एक ते सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत घारगांव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगीता बाळु वाघ या वाघ वस्ती येथील रहिवासी असून बुधवारी दुपारी एक ते सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या दरम्यान वाघ यांच्या बंद घराचे कुलूप कुणीतरी कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश करून बंगल्याच्या कामासाठी घरात ठेवलेले ४५००० हजार रुपये रोख रक्कम चोरुन पोबारा केला.
ही घटना वाघ यांच्या लक्षात येताच त्यांनी घारगांव पोलीस ठाणे गाठून अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे करत आहेत.
