लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा (MVA) फॉर्मुला ठरलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गटाच्या २१ जागा, राष्ट्रवादीच्या १९ जागा आणि काँग्रेसच्या ८ जागा लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा (MVA) फॉर्मुला ठरलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गटाच्या २१ जागा, राष्ट्रवादीच्या १९ जागा आणि काँग्रेसच्या ८ जागा लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी ४ जागा ठाकरे गट लढवेल तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असणार आहे. लोकसभा निवडणुकी अवघ्या १ वर्षावर आल्या आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यांमध्ये ४८ जागांपैकी ५ ते ६ जागा अश्या आहेत ज्यावर महाविकास आघाडीचे पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये फेरबदल होऊ शकतो. भारतीय जनता पार्टीने सुद्धा तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठीरणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे.महाराष्ट्रामध्ये ४८ जागांवर लोकसभेची निवडणूक होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. २०१९ मध्ये ४८ पैकी २३ जागा भाजपने जिंकल्या होत्या तर १८ जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेसने आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.
परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये ४५ जागा जिंकण्याचे ध्येय भाजपने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपची नजर असेल. भाजपने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक सूचना सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या रणनीतीनंतर शिवसेना काय करणार हे बघणे महत्वाचे ठरेल.
