महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रात सध्या 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे.
महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. यापूर्वी एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार आहे. या प्रकारामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 8 मार्चला ताप सर्दी असल्याने रुग्ण पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. सध्या पिंपरी- चिंचवड शहरात ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
