Shivsena : शिंदे गटात ‘या’ माजी मंत्र्याचा जाहीर प्रवेश

महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी खूप मोठा निर्णय घेतला. त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना (ShivSena) पक्षात प्रवेश केला.

मुंबईत बाळासाहेब भवन येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी भूमिका मांडताना दीपक सावंत हळहळले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला खूप काही दिलं. पण गेल्या तीन वर्षांपासून रिटायर केलं.

मला मंत्रीपद नको, मला काम हवं, अशा शब्दांत दीपक सावंत हळहळले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काम करणाऱ्या व्यक्तीला कुणीही थांबवू शकत नाही, असं म्हणत दीपक सावंत यांचं आपल्या पक्षात स्वागत केलं.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप दिलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मला खूप दिलं. आमदारकी दिली. त्यांचे खूप आभार मानतो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मला रिटायरमेंट दिलं.

मला काम करायचं होतं. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मला काम मिळेल. मला मंत्री पद नको. मला काम हवं. मी उद्धव साहेबांना ऑनलाईन पत्र दिलं होतं की, मला काम द्या”, अशा शब्दांत दीपक सावंत हळहळले.

Leave a Comment