Eknath Shinde : CM एकनाथ शिंदे यांची विधानसभेतून मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत शेतकऱ्यांच्या लाँग मार्चबाबत(Long March) मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी कांदे उत्पादक शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान दिलं होतं. पण सरकारने यामध्ये आणखी 50 रुपयांची वाढ केली आहे.

“कांद्यामध्ये झालेली घसरण लक्षात घेऊन 300 रुपयांवरुन आणखी 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.

“शेतकऱ्यांनी आदिवासींची वनजमिनी त्यांच्या नावावर करण्याची मागणी केलीय. याबाबत एक समिती गठीत करण्यात आलीय. एक महिन्यात ही समिती अहवाल देईल.

शेतकरी संघटनेचे नेते जे पी गावित, विनोद निकोले हे‌ आदिवासी आमदारही ‌समितीचे सदस्य राहतील. कांद्याला प्रतिक्विटंल 350 रुपये देणार. त्यांचं आंदोलन राजकीय नव्हतं. जे पी गावित यांना विनंती करतो लाँग मार्च स्थगित करावा”, असं एकनाथ शिंदे काल सभागृहात म्हणाले.

Leave a Comment