मेष : आरोग्य चांगले राहील. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा.
वृषभ : बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेत आनंदात वेळ घालवाल.
मिथुन : रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि शिल्लक कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
कर्क : यात्रेवर जाणार असाल तर आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. कारण, चोरी होण्याची शक्यता आहे.
सिंह : आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल.
कन्या : तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.
तूळ : जीवनसाथीच्या आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल.
वृश्चिक : पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता.
धनु : आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील.
मकर : तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्त्व यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल आणि त्यांच्याशी संपर्क वाढवाल.
कुंभ : नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडी विश्रांती घ्या.
मीन : आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे.
