मोठी बातमी! भाजप नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्याने शिंदे गटात खळबळ….

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचं विधान केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा तो व्हिडीओसुद्धा भाजपकडून तातडीने हटवण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाटांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केला आहे.

बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असं म्हणत संजय शिरसाटांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलंय. अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना दिला आहे. ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल.

त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असंही ते म्हणालेत.

Leave a Comment