पिंपळगाव देपा, साकूर फाट्यावर तुफान गारांचा पाऊस

संगमनेर – तालुक्यातील पिंपळगाव देपा, साकूर फाटा, कौठेमलकापूर, खंडेरायवाडी, जांभूळवाडी सह परिसरात आज दुपारी १ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली.

जवळपास अर्धा तास गारांचा पाऊस सुरू होता. दुपारी अचानक गारांचा पाऊस सुरू झाल्याने परिसरात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह शेतमजूरांची एकच धावपळ उडाली.

तसेच या गारपीटीने परिसरातील कांदा, हरभरा, मका, आदि पिकांचे नुकसान झाले असून शेत पिकांंनाही चांगलाच फटका बसला आहे.तसेच साकूर फाट्यावर महामार्गावर गारांचा थर तयार झाला होता.

Leave a Comment