भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची जोरदार सभा झाली. या सभेला उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेसाठी हा काळा दिवस आहे, असं म्हटलं होतं.
त्यांच्या या विधानाचा आता काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
थोरात म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लोकशाहीकडं बघण्याचा दृष्टीकोन काय आहे हे समजतं त्यांच्याविधानावरुन. ही लोकशाही आहे, त्यामुळं लोकसभेची महत्वाची निवडणूक सुरु झाली आहे. तर त्याचा सभा घेणं एक महत्वाचा भाग आहे. लोकांशी संवाद करण्याला ते काळा दिवस म्हणतात, त्यामुळं त्यांनी अत्यंत दुर्देवी विधान केलेलं आहे.
