आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवारांची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलीय. जयंत पाटील यांनी यावेळी पाच उमेदवारांची घोषणा केलीय.
या आधी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले होते. कॉंग्रेसने ८ तर ठाकरे गटाने एकूण सतरा उमेदवारांची घोषणा केली होती. यात आता शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.
मुंबई येथील कार्यालयात जयंत पाटील यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये वर्धा लोकसभेतून अमर काळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर दिंडोरी लोकसभेतून भास्कर भगरे, बारामतीत सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, तर अहमदनगर मधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केलीय.
