बापरे! अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा कहर, तापमानाने गाठला उच्चांक

महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल 41 ते 45 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात 41. 2 अंश सेल्सिअस तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा परिणाम दैनंदीन कामकाजावर होताना दिसत असून, रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. विहिरींच्या पाण्याची पातळीही झपाट्याने कमी होत आहे.

Leave a Comment