अन् सुप्रिया सुळे झाल्या भावूक, म्हणाल्या…..

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सर्व राज्याचं लागलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात नणंद विरोधात भावजयी असा सामना रंगणार आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर होताच सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

 

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

मी इंडिया आघाडीचे आभार मानते की त्यांनी मला पुन्हा एकदा लोकसभेसाठी संधी दिली. मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे देखील आभार मानते. पुन्हा मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे अशी मी विनंती करते. माझी लढाई ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाहीये, मी कोणावरही व्यक्तीगत टीका केलेली नाहीये. माझी लढाई ही बेरोजगारी, दडपशाही विरोधात असणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांनी आमच्या आईला निवडणुकीत उतरवलं, आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना निवडणूक लढवावी लागते, असं सुळे यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment