मुंबई (DSNews24/किरण पुरी) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षातील उमेदवारांची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी बागल यांनी केलीय. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत सहा उमेदवारांची घोषणा केलीय. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून अजिंक्य साळुंखे बोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातून संजय विनायक जगताप, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून एडवोकेट श्रीहरी तुकाराम बागल, नाशिक लोकसभा मतदारसंघातून विकास बागल, सांगली लोकसभा मतदारसंघातून बाळासाहेब साबळे व संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून सलीम शहा यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
तसेच जळगाव, अकोला, नागपूर, नांदेड, परभणी, जालना, पालघर, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षीण मध्य, पुणे, बारामती, अहमदनगर, शिर्डी, बीड, धाराशिव ,लातुर, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले अशा ३२ ठिकाणी हि लोकसभा मतदारसंघात निवडणूकीत उमेदवार देणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल साहेब यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वराज्य सेना हा महायुतीचा घटक पक्ष असताना भारतीय जनता पार्टी वर नाराज असल्याने राजकीय पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहे. २०१४ लोकसभा पासुन राष्ट्रीय स्वराज्य सेने ने भाजपा चे लोकसभा व विधानसभा व ईतर सर्व निवडणूकीत भाजपाचे काम केले होते महायुती चा घटक पक्ष असताना सरकार मध्ये काम करण्याची संधी किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये तिकीट न दिल्याने नाराज मीत्र पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे.
